मर्दानी खेळ विशारद
इतिहास अभ्यासक
जिल्हा उपाध्यक्ष लाठीकाठी-दांडपट्टा असोसिएशन
शिवकालीन साहित्य संग्राहक
सीनियर फुटबॉल खेळाडू व पंच
७ राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित व्यक्तिमत्त्व
श्री. संदीप उर्फ नाना सावंत
मर्दानी खेळ विशारद
इतिहास अभ्यासक
जिल्हा उपाध्यक्ष लाठीकाठी-दांडपट्टा असोसिएशन
शिवकालीन साहित्य संग्राहक
सीनियर फुटबॉल खेळाडू व पंच
७ राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित व्यक्तिमत्त्व
श्री. संदीप उर्फ नाना सावंत
समाजासाठी कार्य, संस्कृतीसाठी बांधिलकी या भूमिकेतून मी – संदीप उर्फ नाना पंडितराव सावंत – गेली अनेक वर्षे शिवसंस्कृतीचा प्रसार, मर्दानी कला, पारंपरिक क्रीडा आणि युवक घडवणूक या क्षेत्रात सातत्याने कार्य करत आहे. शिवकालीन इतिहासाचे जतन, शिस्तबद्ध जीवनशैलीचा आग्रह आणि संस्कृतीशी निष्ठा हीच माझी ओळख आहे. कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, वाढती गुन्हेगारी, प्रशासनातील भ्रष्टाचार तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर मी प्रत्यक्ष कृतीतून काम केले आहे. नागरिकांच्या समस्या ऐकून घेणे, अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरून लढा देणे आणि प्रशासनाला जाब विचारणे ही माझी ठाम भूमिका राहिली आहे. कृतीतून समाजासाठी काम करणे, पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासन उभे करणे, युवकांना दिशा देणारे व संस्कृती जपणारे नेतृत्व घडवणे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य देणे — जनतेचा विश्वास, जनतेसोबत संघर्ष आणि जनतेसाठी विकास हेच माझे अंतिम ध्येय आहे.