मर्दानी खेळ विशारद
इतिहास अभ्यासक
जिल्हा उपाध्यक्ष लाठीकाठी-दांडपट्टा असोसिएशन
शिवकालीन साहित्य संग्राहक
सीनियर फुटबॉल खेळाडू व पंच
७ राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित व्यक्तिमत्त्व
श्री. संदीप उर्फ नाना सावंत
मर्दानी खेळ विशारद
इतिहास अभ्यासक
जिल्हा उपाध्यक्ष लाठीकाठी-दांडपट्टा असोसिएशन
शिवकालीन साहित्य संग्राहक
सीनियर फुटबॉल खेळाडू व पंच
७ राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित व्यक्तिमत्त्व
श्री. संदीप उर्फ नाना सावंत
शिवकालीन शस्त्रसंग्रहक | मर्दानी कला प्रशिक्षक | शिवसंस्कृती प्रसारक
मी श्री. संदीप उर्फ नाना पंडितराव सावंत. माझा जन्म कोल्हापूरच्या ऐतिहासिक व रांगड्या शिवाजी पेठेतील लढवय्या साळुंखे घराण्यात झाला. विचार, अभ्यास व संस्कारांची परंपरा लाभलेल्या कुटुंबात माझे बालपण घडले. आजोबा संस्थान काळात मोजणी खात्यात कार्यरत होते, तर वडील पंडितराव सावंत हे विचारवंत लेखक व करसल्लागार होते. आई कै. प्रमोदिनी या जिंजीचे किल्लेदार साळवी घराण्यातील होत्या.
लहानपणापासूनच मैदानी खेळ, मर्दानी कला, शिवजयंती उत्सव आणि पारंपरिक शस्त्रकलेचे संस्कार माझ्यावर झाले. शिवाजी पेठेतील नाथा गोळे तालमीत मर्दानी खेळांचे बाळकडू मिळाले, तर नंगीवली तालमीचे वस्ताद कै. शामराव जाधव यांच्याकडून काठी, पट्टा, तलवार, भाला, फरी, गदगा आदी मर्दानी शस्त्रांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले.
विद्यार्थीदशेत मर्दानी खेळांत प्राविण्य मिळवत असताना मी सिनियर फुटबॉल खेळाडू व फुटबॉल पंच म्हणूनही कार्यरत होतो. शरीरसौष्ठव स्पर्धा, व्यायामशाळेतील शिस्त आणि विवेकानंद कॉलेजमधील शिक्षण या सर्वांनी माझ्या जीवनाला दिशा दिली. या काळात महाराष्ट्रभर मर्दानी कलेचे सादरीकरण करण्याची संधी मिळाली.
नोकरी करत असतानाही शिवकालीन इतिहास, मर्दानी कला व शस्त्रसंग्रहाचा छंद कधीच थांबला नाही. वडिलांकडून वारसा म्हणून मिळालेल्या ऐतिहासिक शस्त्रांपासून संग्रहाची सुरुवात झाली. किल्ले, वाडे, गढ्या यांचा अभ्यास करत इतिहास-वाचनाची गोडी वाढली. आज माझ्याकडे २५०० हून अधिक ऐतिहासिक पुस्तके असून प्रत्येक शस्त्राचा सखोल अभ्यास मी केला आहे.
सन २००४ मध्ये मी “शिवगर्जना प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्था” स्थापन केली. या संस्थेमार्फत मर्दानी खेळांचा प्रसार, शिवकालीन शस्त्रसंग्रह, गडकोट मोहिमा, प्रशिक्षण शिबिरे, व्याख्याने व इतिहास जागर असे विविध उपक्रम राबवले जात आहेत. आज माझ्याकडे ७०० हून अधिक ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह आहे.
आजवर महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात व मध्यप्रदेशमध्ये हजारहून अधिक शस्त्रप्रदर्शनांचे आयोजन केले आहे. अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी मला गौरवण्यात आले असून “शिवकालीन शस्त्रे” हे सदर दैनिक सकाळमध्ये वर्षभर प्रसिद्ध झाले, हे माझ्या कार्याचे मोठे समाधान आहे.
शिवरायांचा इतिहास, शौर्य, शिस्त व संस्कृती पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे, मर्दानी खेळांचा वसा जपणे, तरुणांना योग्य दिशा देणे आणि समाजहितासाठी काम करणे — हेच माझे जीवनध्येय आहे.